आत्तापर्यंत तुम्ही व्यवसायाबद्दल अनेक गोष्टी, टिप्स, सूचना आणि सल्ले घेतले असतील, अभ्यासले असतील आणि बहुंशी त्यांचा उपयोग देखील करून घेतला असेलच.
मुळातच "व्यवसाय किंवा उद्योग" हे एक अजब रसायन आहे आणि म्हणूनच उद्योजकाने सतत प्रयोगशील असणे गरजेचे आहे. गम्मत बघा डॉक्टर, इंजिनीअर किंवा अकौंटंट होण्यासाठी काही विशिष्ठ शिक्षणाची आवश्यकता असते, उदा. डॉक्टर म्हटल कि सायन्स आणि त्यातल्या त्यात जीवशास्त्र शिकणे आवश्यक, इंजिनीअर म्हटले कि गणित कसे पक्के हवे आणि काही क्षेत्रात तर हिशेब जमलाच पाहिजे.
पण व्यवसायच कसं आहे बघा ना, इथे सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स काहीही येत असेल किंवा येत नसेल तरी प्रवेश मिळतो. हीच तर गम्मत आहे, महत्वाचे हे नाही कि तुम्हाला काय येते किंवा काय येत नाही, महत्वाचे हे आहे कि तुमची शिकण्याची इच्छा आहे का?
आणि फक्त ह्या एका नियमावर तुम्ही तुमचा व्यवसाय वा उद्योग सुरु करू शकतात,
वाढवू शकतात आणि मोठा करू शकतात.
तर आज मी इथे आपणा सर्वाना काही अत्यावश्यक अशा गोष्टी सांगणार आहे, ह्या गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, तुमच्या उद्योग व्यवसायात अवलंब केला तर मला खात्री आहे कि तुमच्या व्यवसाय वा उद्योगाची नक्कीच भरभराट होईल.
गेल्या कित्येक वर्षात देशभरातील अनेक व्यवसायिक आणि उद्योजकांना भेटण्याचा, त्यांच्यासोबत बोलण्याचा, काम करण्याची मला संधी मिळत गेली आणि त्या प्रत्येकाकडून नेहमी मला नवीन काही शिकायला मिळाले.
त्याच अनुभवातून मी इथे तुमच्यापुढे व्यवसायाची पंचसुत्री मांडत आहे, आशा आहे तुम्ही याचा उपयोग कराल. माझी स्वत:ची व्यवसायाबद्दल एक व्याख्या आहे, मी नेहमी म्हणतो कि
"व्यवसाय म्हणजे फक्त नफा मिळविणे नव्हे तर व्यवसाय म्हणजे वाढत जाणारा नफा."
आणि त्यासाठी अत्यावश्यक अशी हि व्यवसायाची पंचसूत्री