किल्ल्याची ऊंची: १३९४ / Height of the Fort: 1394 ft.
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग / Type of the Fort: Hill Fort
डोंगररांग: डोंगररांग नाही / Fort Range: No
जिल्हा: पुणे / District: Pune
श्रेणी: मध्यम / Difficulty: Medium
या ट्रेक मध्ये आपल्याला काय मिळेल?
1. पुणे ते पुणे प्रवास , 2. प्रथमोपचार पेटी, 3. चहा / कॉफी, 4. १ वेळचा नाष्टा, 5. १ वेळचे जेवण
आमच्यासोबत ट्रेक का?
या ट्रेक मधील नफा हा किल्ले संवर्धन व पर्यावरण संवर्धन या कार्यासाठी केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवण्यासोबत किल्ल्यावरील स्वच्छता व वृक्षारोपण करणे.
इतिहास :
छत्रपती राजाराम महाराजांचे जन्मस्थान राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ किमी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्विनी स्वर्गावर केलेली स्वारी होय.
इतिहास -राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमीपूर्ण सातकर्णी याने दिले. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २५ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनाचे धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदावी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.
नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.
१)'राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचे नेते शिवाजी भेासले यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला.' -जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे)
२) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो- 'राजगड हा अतिशय उंच. त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.'
३) महेमद हाशीम खालीखान हा 'मुन्तखबुललुबाब-ए-महेमदॉशाही ' नामक ग्रंथामध्ये म्हणतो,'राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु?काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस पशू दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते.
सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वीपासून हा डोंगर प्रसिद्ध आहे, असे इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखांवरून वाटते. एका ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरून डोंगर फार पुरातन काळापासून ज्ञात असावा. राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव. हा किल्ला बहमनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते.
सोबत काय घ्याल: एक दिवसीय ट्रेक / What You Should Carry: One Day Trek
पाण्याची बाटली (अत्यावश्यक) / Water Bottle (Important)
ओळखपत्र (आवश्यक माहितीआणि फोटोसह) / Identity Proof with a Passport Size Photo
टोपी / Cap
ट्रेकिंग बूट किंवा चांगली ग्रीप असेल असे बूट अत्यावश्यक / Sport Shoes with Good Grip
औषधे चालू असल्यास ती सोबत घ्यावी / Essential Medicines
कोरडा खाऊ (प्राधान्याने अधिक बिस्किटे, राजगिरा, चुरमुर्यांचा चिवडा, सुका मेवा आणि कमी तेलकट वस्तू) / Snacks as Needed
पावसापासून आपले संरक्षण करणारे कपडे छत्री / रेनकोट / Raincoat
कपडे एक किंवा दोन जोड्या आवश्यक असल्यास / Extra Pair of Clothes 1 / 2 Pair as You Need
पैसे आपल्याला काही वयक्तिक घेण्यासाठी लागल्यास / Extra Cash if You Wish to Buy Something
दिवा / मशाल (रात्रीच्या वेळी आवश्यक) / Torch, Good at Night
पेन आणि नोटबुक / Pen & Notebook
सुरक्षा साहित्य / Pocket Knife
आपले आणखी काही प्रश्न असल्यास कृपया खालील क्रमांकावर संम्पर्क साधा- जितेंद्र शिंदे - +९१ ७४४७४४००६६
For any questions or queries, please contact Jitendra Shinde on +91 7447440066.