प्रति,
मुख्याध्यापक / क्रीडा अधिकारी / धावपटू
विषय :- निसर्ग पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धन व लोकप्रबोधनास प्रोत्साहन देणाऱ्या अर्ध मॅरेथॉन “ पारगड हेरिटेज रन”
कार्यक्रमात निवडक विद्यार्थ्यांसमवेत सहभागी होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण.
महोदय,
“ रनिंग या क्रीडाप्रकाराच्या माध्यमातून खेळ आणि निसर्ग पर्यटन एकत्रीत करणे आणि त्यामार्गे निसर्ग संवर्धनास प्रोस्ताहन देणे व लोकप्रबोधनाची एक चळवळ घडवून आणणे हाच प्रामाणिक प्रयत्न आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशन करीत आहे.
“आमदार श्री राजेश नरसिंगराव पाटील प्रस्तुत पारगड हेरिटेज रन” (अर्ध मॅरेथॉन) हि पहिली आवृत्ती “#प्रथम निसर्ग” [#NatureFirst] अशा घोषवाक्यावर आधारित आहे. निसर्गाचे प्रथमस्थान आहे हे आम्ही जाणतो आणि या उपक्रमातून हाच संदेश देऊ इच्छितो. “
पर्यावरण विषयक अनेक प्रश्नांनी सध्या गंभीर स्वरूप धारण केले आहे, त्यात वनांचा ऱ्हास हे एक मुख्य कारण आहे. वर्षावन आणि त्यातील वनस्पती आणि वन्यजीवांचे संवर्धन व त्याचे महत्व जनसामान्यापर्यंत पोहचवणे यासोबत मानसिक आणि शारीरिक आरोग्य याचा कसा समतोल ठेवावा यासाठी आउट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशन नेहमी प्रयत्नशील आहे व हेच आमचे उद्धिष्ट आहे.
या कामाची व्याप्ती पाहता मोठ्या प्रमाणात लोकसहभाग वाढविणे अपरिहार्य आहे. हि बाब विचारात घेऊनच आम्ही “पारगड हेरिटेज रन” हा उपक्रम सुरु करण्याचे निर्धारिले आहे. पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक समस्यांवर विस्तृत विचार करून शर्यतीचे आयोजन केले जाईल,जे निसर्ग संवर्धनाच्या या प्रकल्पात सहभागी होण्याची इच्छा व वचनबद्धता दर्शवतील अश्या सर्व सहभागी सदस्यांना रोपटे देऊन गौरविण्यात येईल.
“पारगड हेरिटेज रन” कार्यक्रमात “निसर्गाचे रक्षक” [Guardians of Nature] या मोहिमे अंतर्गत खालील मुद्यांवर लोकप्रबोधन करू इच्छिले आहे.
नैसर्गिक संवर्धन.
वृक्ष लागवड.
पाणी संवर्धन.
कचऱ्याचे पुनर्विनीकरण.
नैसर्गिक उर्जा कार्यक्षमता.
कार्यक्रमा दरम्यान वरील प्रत्येक श्रेणीत कार्यरत तज्ञ/वक्ते या विषयांची गंभीरता लोकांसमोर मांडतात व यावर उपाय योजना सुचवतात. हा संकल्प आम्ही शासकीय यंत्रणा आणि जनतेच्या सहभागातून निश्चित यशस्वी करू अशी आम्हाला खात्री आहे.
ग्रुप ग्रामपंचायत मिरवेल,किल्ले पारगड, नामखोल आणि किल्ले पारगड जनकल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्षेत्रात निपुण ऑल्टिट्यूड क्वेस्ट ऍडव्हेंचर एल एल पी हि कुशल,अनुभवी संस्था कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन करणार आहे. आपल्या संस्थेकडून/विभागाकडून गैर व्यावसायिक प्रायोजकत्व, सकारात्मक प्रतिसाद तसेच योगदान मिळण्याची आशा बाळगतो. “पारगड हेरिटेज रन” कार्यक्रमासाठी कृपया आपले मोलाचे सहकार्य तसेच पाठींबा असावा, हि विनंती…..
मदतीचे आवाहन:
सर्व एनसीसी NCC कॅडेट्स आणि एनएसएस NSS विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य प्रवेश
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळ, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे व संबंधित संस्था यांनी पारगड हेरिटेज रन या कार्यक्रमास निवडक विध्यार्थी (३ मुले + ३मुली = एकूण ६) स्पर्धक म्हणून विनामूल्य सहभागी होता येणार आहे.
खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक टीम सोबत एक प्रशिक्षक व खेळाडूस प्रवास भत्ता संबंधित शाळेकडून विध्यार्थाना प्राप्त व्हावा हि कळकळीची विनंती.
धन्यवाद !
PTO…
वेळापत्रक “पारगड हेरिटेज रन” (अर्ध मॅरेथॉन)
स्थान : पारगड किल्ला, चंदगड तालुका, कोल्हापूर
स्पर्धेच्या श्रेणी पुढीलप्रमाणे असेल:
जॉय ऑफ जंगल ( ५ किलो मीटर धावणे )
जंगल ड्रीम रन ( १० किलो मीटर धावणे )
जंगल हाफ मॅरेथॉन ( २१ किलो मीटर धावणे )
सदर शर्यत किल्ले पारगड व तिलारी धरणाचे विलोभनीय दृष्य रानवाटेतून दाखवत संपन्न होईल.
कार्यक्रम दिनांक: ५ जून २०२२
सकाळी ४. ३०वाजता ::::स्पर्धकांचे आगमन
सकाळी ५ वाजता ::::::::: न्याहारी (ते 7 वाजेपर्यंत खुले राहणार आहे)
सकाळी ५:३० वाजता :::: स्ट्रेचिंग व्यायाम आणि उद्घाटन समारंभ
सकाळी ६ वाजता :::::::::::: स्पर्धेची सुरवात जंगल हाफ मॅरेथॉन ( पहिली तुकडी महिला २१ किलो मीटर धावणे )
सकाळी ६.१५ वाजता ::::::: स्पर्धेची सुरवात जंगल हाफ मॅरेथॉन ( दूसरी तुकडी पुरुष २१ किलो मीटर धावणे )
सकाळी ६.३० वाजता ::::::: स्पर्धेची सुरवात जंगल ड्रीम रन ( पहिली तुकडी महिला १० किलो मीटर धावणे )
सकाळी ६.४५ वाजता :::::: स्पर्धेची सुरवात जंगल ड्रीम रन ( दूसरी तुकडी पुरुष १० किलो मीटर धावणे )
सकाळी ७ वाजता ::::::::: स्पर्धेची सुरवात जॉय ऑफ जंगल ( पहिली तुकडी महिला ५ किलो मीटर धावणे )
सकाळी ७.१५ वाजता ::::: स्पर्धेची सुरवात जॉय ऑफ जंगल ( दूसरी तुकडी पुरुष ५ किलो मीटर धावणे )
सकाळी ९ वाजता ::::::::: पारितोषिक वितरण समारंभ
सकाळी १० वाजता ::::::: मान्यवरांकडून मार्गदर्शन आणि वृक्षारोपन सोहळा
सकाळी ११ वाजता ::::::: स्पर्धा समाप्तीची घोषणा आणि आभार प्रदर्शन
नोंद:
४ जून २०२२ रोजी राहण्याची व जेवणाची सोय फक्त सशुल्क सहभागींसाठी तात्पुरत्या तंबूत दुहेरी सामायिकरण आधारावर करण्यात येईल त्याची फीस ५०० रुपये असेल. मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी २० फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळचा नाश्ता आयोजक संघाकडून सर्वांसाठी विनामूल्य असेल.
५ जून २०२२ कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी 03.30/ 04:00/ 04:30 वाजता चंदगड आगारातून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
( एस. टी. ) ची सुविधा स्पर्धकांना उपलब्ध करून दिली जाईल याची नोंद सर्व शाळा, महाविद्यालयांनी घ्यावी. तसेच ज्यादा गाड्यांचे नियोजन करून परतीच्या वेळी हि एस. टी. ची सुविधा पुरवण्यात येईल. एस. टी. पारगड मार्गावर सर्व बस थांब्यांवर थांबणार आहे.
४ थी ते ७ वी च्या विध्यार्थ्यांना ५ किलो मीटर धावणे “जॉय ऑफ जंगल” या श्रेणीत सहभागी होता येणार आहे.
८ वी ते १० वी च्या विध्यार्थ्यांना ५ किलो मीटर धावणे “जॉय ऑफ जंगल” किंवा १० किलो मीटर धावणे “जंगल ड्रीम रन” यापैकी कोणत्याही एका श्रेणीत सहभागी होता येणार आहे.
महाविध्यालयीन विध्यार्थ्यांना ५ किलो मीटर धावणे “जॉय ऑफ जंगल”, १० किलो मीटर धावणे “जंगल ड्रीम रन” किंवा २१ किलो मीटर धावणे “जंगल हाल्फ मॅरेथॉन” यापैकी कोणत्याही एका श्रेणीत सहभागी होता येणार आहे.
शारीरिक प्रशिक्षण शिक्षक (P.T. TEACHER) यांनी निवडक स्पर्धकांची नावे दिलेल्या फॉर्म मध्ये भरून पुढील ई-मेल आयडी वर स्कॅन करून मेल करावेत : outplaysportsfoundation@gmail.com किंवा ९९८७ ३२२२२७ या व्हाट्सअँप नंबर वर फोटो काढून पाठवावे.
तसेच प्रत्येक विध्यार्थी शिक्षकांच्या अनुमती नुसार ऑनलाईन फॉर्म पुढील लिंकवर उपलब्ध आहेत ते सबमिट करून देखील स्वतः नोंदणी करू शकतो: https://forms.gle/8dDGLEsekCeT38Fi9
क्रीडा, शारीरिक शिक्षण व युवक कल्याण विषयक उपक्रमांसाठी जागृती निर्माण व्हावी व महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जावा व त्याचे संवर्धन व्हावे यासाठी आउट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशन पुढाकाराने, आमदार श्री राजेश नरसिंगराव पाटील यांच्या सहकार्याने पारगड हेरिटेज रन हा कार्यक्रम आजोयित करण्यात आले आहे. त्यासाठी आपला सहभाग खूप मोलाचा राहील…
धन्यवाद !
आपले विश्वासू,
श्री. प्रविण चिरमुरे,
संचालक, आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशन.